आंदोलनात फेकलेल्या दुधात किती दूध आणि किती पाणी असते हे आम्हाला ठाऊक आहे; सदभाऊंचे वादग्रस्त वक्तव्य



नागपूर : स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध दरवाढ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टींवर निशाणा साधला आहे. परंतु बोलताना तोल सोडून या ओतल्या जाणाऱ्या दुधात दूध किती आणि पाणी किती? हे मला माहीत असतं, असं राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. असं वक्तव्य करुन त्यांनी दूध आंदोलनांची खिल्ली उडवली आहे.
आगामी लोकसभा निवडणुका ठेवून शेट्टी आंदोलन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आम्ही निश्चितच त्यांना न्याय देऊ. पण सध्या जे आंदोलन सुरू आहे; ते शेतकऱ्यांसाठी नसून एका व्यक्तीसाठी आहे, असे मंत्री खोत यांनी म्हटले आहे.
ज्या पद्धतीने मी गेले 30 वर्षे आंदोलन करत आलोय. त्यामुळे काय आणि कसं आंदोलन केलं जातं, हे मला माहीत आहे, असं सदाभाऊ म्हणाले.

Comments