"सरकारला पाकिस्तानी साखरेचा गोडवा का ? पाकिस्तानी साखर मुंबईत दाखल..!





मुंबई: देशात साखरेचे विक्रमी ३०० लाख टनांपेक्षा अधिक उत्पादन झाले असतानाही केंद्र सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात केली आहे.नवी मुंबईच्या एपीएमसी येथे ही साखर दाखल झाली आहे.


अतिरिक्त साखर उत्पादनामुळे राज्यासह देशभरातील शेतकरी आणि साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत.शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य तो भाव मिळत नाहीये. तर *आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे कारखाने शेतकऱ्यांना त्यांची रक्कम चुकती करण्यास असमर्थ ठरत आहेत. देशातील सर्व साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची असलेली थकबाकी ही सध्यस्थितीत जवळपास १९ हजार कोटींपर्यंत पोहचली आहे. याशिवाय गेल्या वर्षीची दोन ते अडीच लाख टन साखर अद्याप पडून आहे. *त्यामुळे पाकिस्तानी साखर आयात करून सरकार एक प्रकारे देशातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठच चोळत आहे.
दरम्यान, पाकिस्तानात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने त्यांनी ती भारतात निर्यात केली आहे. त्यांच्या साखरेचा दर भारतातील साखरेपेक्षा १ रुपयाने कमी असल्याने शेतकरी तसेच कारखानदारांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments