नवी दिल्ली: “२०१७-१८ (ऑक्टोबर २०१७-सप्टेंबर २०१८) या कापूस उत्पादन वर्षात भारतीय कापूस उत्पादनात ९.३ टक्क्यांनी वाढ होऊन ते ३७.७ दशलक्ष गाठींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. असा अंदाज कापूस सल्लागार मंडळाकडून (सीएबी) व्यक्त करण्यात आला आहे.
देशातून चालू आर्थिक वर्षात ६.७ दशलक्ष गाठी इतक्या कापसाची निर्यात होण्याची शक्यता आहे. म्हणजेच १ ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या हंगामात मागील वर्षीच्या निर्यात करण्यात आलेल्या ५.८२ दशलक्ष गाठींपेक्षा १५.१ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.” अशी माहिती कापूस सल्लागार मंडळाच्या आयुक्त डॉ. कविता गुप्ता यांनी दिली आहे.
अलीकडेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये झालेल्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अन्य कापूस उत्पादक प्रदेशांत मात्र त्याचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहेत.
शेतीशी व जोडधंदाशी निगडीत सर्व उपयोगी अवजारे आता आपण ऑनलाईन मागवू शकता
Comments
Post a Comment